मुंबई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र स्वादुपिंडाचा त्रास असल्यामुळे भुजबळांवर केईम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


भुजबळ सुटले!

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांमध्ये काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली भुजबळांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45 हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी अशी मागणी भुजबळांनी केली होती. 14 मार्च 2016 पासून भुजबळ तुरुंगात आहेत. तेव्हापासून भुजबळ यांचे जामिनासाठीचे प्रयत्न सुरु होते. प्रकृती अस्वास्थ्याचं कारण पुढे करुनही त्यांना जामीन मिळवण्यात अपयश आलं. मात्र, आज 2 वर्षांनंतर भुजबळ यांना जामीन मंजूर झाला आहे.

संबंधित बातम्या :

भाजपच्या फायद्यासाठी भुजबळांना बाहेर काढलं : राज ठाकरे

न्यायमूर्ती स्थानपन्न झाले आणि थेट घोषणा केली, कोर्टात नेमकं काय घडलं?

या चार अटींवर छगन भुजबळांना जामीन मिळाला

‘हे’ कलम रद्द झाल्याने छगन भुजबळ सुटले!

14 मार्च 2016 ते 4 मे 2018, भुजबळांची अटक ते जामीन, नेमकं काय घडलं?

अखेर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर