एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/05/2018


1.    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर, नाशिक-येवल्यातील समर्थकांमध्ये जल्लोष, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोन वर्षांपासून भुजबळ तुरुंगात https://goo.gl/7WCiTz पीएमएलए कायद्याचे कलम 45(1) रद्द झाल्याचा भुजबळांना फायदा https://goo.gl/eci2H4

2.    अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयातून फाईल्स पळवल्याचं प्रकरण, राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदमांच्या भावाने चोरी केल्याचे उघड, महाव्यवस्थापक दत्तात्रय झोंबाडे निलंबित https://goo.gl/NpuHpt

3.    बीड जिल्हा परिषदेचे सहा सदस्य अपात्र, आगामी विधान परिषद निवडणुकीत अपात्र सदस्यांना मतदान करता येणार नाही, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांना धक्का https://goo.gl/iJyexF

4.    आजच्या जमान्यात कुणीच महात्मा गांधी राहिला नाही, न्यायाधीश असो वा कुणीही, सरकारी योजनांतून एकापेक्षा जास्त घरं का? सरकारी घरं लाटणाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे https://goo.gl/B5p2tj

5.    लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या, साताऱ्यातील 28 वर्षीय नितीन शेंडगेचं टोकाचं पाऊल https://goo.gl/FuwT6C

6.    सुयोग्य वर हवाय, जातीची अट नाही; केरळमधील 28 वर्षीय तरुणीची फेसबुक पोस्ट व्हायरल! https://goo.gl/pvzcRs

7.    पवना धरणातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणी देणं बेकायदेशीर, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, पुण्यातील आयपीएल सामन्यांना यापुढे पाणी मिळणार नाही http://abpmajha.abplive.in/

8.    पुणे विमानतळावर सोनं तस्करी करणाऱ्या महिलेचं बिंग फुटलं, तीन किलो सोन्यासह महिला जेरबंद, सीमा शुल्क विभागाची कारवाई https://goo.gl/ZCJzrp

9.    महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या पुण्यातील आंबा महोत्सवात आग, सर्व 60 स्टॉल्स जळून खाक, दोन-अडीच तासानंतर आग आटोक्यात https://goo.gl/gTpZFi

10.    खबऱ्यांनीच नागपूर पोलिसांना गंडवलं, अडीच कोटींवर डल्ला, नागपुरातील हवाला प्रकरणाला नवं वळण https://goo.gl/sHma6c

11.    अॅट्रॉसिटीच्या निर्णयाला स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारची मागणी फेटाळली, अॅट्रॉसिटीअंतर्गत तक्रार झाल्यास चौकशीनंतरच अटकेचा 20 मार्चचा निर्णय कायम https://goo.gl/FN4r9x

12.    हिमाचल प्रदेशात अतिक्रमण पाडणाऱ्या महिला अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करणारा मारेकरी सापडला, लोकेशन ट्रेस करुन आरोपीला दोन दिवसांत बेड्या https://goo.gl/Te8hr9

13.    ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचं दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 72 व्या वर्षी कोल्हटकरांचा पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/AVdafm

14.    यंदा साहित्याचा नोबेल दिला जाणार नाही, लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर स्विडीश अकॅडेमीचा निर्णय, 2019 च्या विजेत्यांसोबतच 2018 च्या विजेत्यांची घोषणा होणार https://goo.gl/LGAKPH

15.    ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला, ट्विटरकडून युजर्सना आवाहन, स्टोअर्ड पासवर्डच्या इंटर्नल लॉगमध्ये बग आढळला https://goo.gl/VGF9CG

REVIEW : सायकल - माणुसकी अधोरेखित करणारी रपेट https://goo.gl/E7KQjv

BLOG : आमच्या छकुलीच्या लग्नाला यायचं हं..!!, लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग https://goo.gl/owxM2o

माझा विशेष : भुजबळांची सुटका भाजपला धक्का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive     

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा