भिंवडी : भिवंडीत महापौर चषक 2021 क्रिकेट स्पर्धेत कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन होत असून एबीपी माझाने त्यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासन खळबळून जागे झाले आहे . मनपा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा आयोजकासह आठ जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोशल डिस्टन्सिंग व मास्क  न लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून महानगरपालिकेने तब्बल 12 हजार रुपयांची वसुली केली आहे.


भिवंडीत पाच वर्षानंतर भव्य महापौर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 14 दिवसांपासून सुरू असलेल्या महापौर चषकादरम्यान कोरोनाबाबत सर्व नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केलं जात होते. प्रदीप चौधरी , विजय मोतीराम ठाकरे, अघोक शंकर पालंडे , विलास बाळु पाटील , भुषण चाफेकर , राजु वगळ, विशाल निकम, प्रविण केडीया या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 , 269 ,270 सह आपत्ती व्यवस्थापण कायदा 2005 चे कलम 51 ( ब ) , सह साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 , सह महाराश्ट्र कोव्हीड 19 विनीयमन 2020 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



भिवंडीत महापौर चषक 2021 स्पर्धेत कोरोनाचे नियम पायदळी, प्रशासनाचं जाणूनबुजून दुर्लक्ष?


भिवंडी महापौर चषक 2021 मध्ये आयोजक, खेळाडू आणि इतरांकडून कोरोनाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवल्याचं पाहायला मिळालं. क्रीडांगणात कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन होत असून पोलिस व मनपा प्रशानाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. महापौर, उपमहापौर यांच्यासह नगरसेवक देखील विनामास्क याठिकाणी आढळले. भिवंडीत पाच वर्षानंतर भव्य महापौर चषक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भिवंडी शहर व तालुक्यातील क्रिकेटपटूंना चॅलेंज ग्राऊंडवर क्रिकेट खेळण्यांचं स्वप्न असतं. त्यामुळे या चषकाची सर्व क्रिकेट खेळाडू आतुरतेने वाट पाहत असतात. भिवंडी महापौर चषकाचे यंदाचे 32 वे वर्ष होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून तब्बल 120 संघांनी यात सहभाग घेतला होता.





 Coronavirus | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; 70 टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवाशी