भिवंडी : मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर पाच नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतील पोगांव पाईपलाईन परिसरात चाकू आणि बंदुकीच्या धाकाने पाच जणांनी तरुणीवर गँगरेप केला.
आझादनगर भागात राहणारा 26 वर्षीय युवक 20 वर्षीय मैत्रिणीसोबत दुचाकीने पोगांव पाईपलाईन परिसरात फिरायला गेला होता. रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास दोघं घरी येण्यासाठी निघाले. त्यावेळी पाच जणांनी त्यांना रस्त्यात अडवलं. तरुणाच्या डोक्याला गावठी कट्टा आणि चाकू लावून आरोपींनी त्याला पाईपलाईनच्या बाजूला नेलं. त्यानंतर नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला. बलात्कारानंतर पाचही नराधम फरार झाले.
घटनेनंतर भयभीत झालेल्या तरुणाने पीडितेसह तालुका पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करुन पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाईपलाईनलगतच्या मातीच्या भरावावर नराधमांच्या पावलांचे ठसे उमटले होते. त्याआधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
भिवंडीतील येवई हद्दीतील 19 वर्षीय किशोर रघुनाथ लाखात याला सर्वप्रथम ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून तपास केला. त्याने अन्य चार जणांच्या साथीने बलात्कार केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रं फिरवत 23 वर्षीय गुरुनाथ गोपाल बारी, 19 वर्षीय हर्षद हिरामण मारले, 24 वर्षीय अविनाश पुंडलिक जाधव आणि 20 वर्षीय गणेश पवार या पाचही नराधमांना अटक केली.
भिवंडीत मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर गँगरेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2019 08:42 PM (IST)
भिवंडीत राहणारा 26 वर्षीय युवक 20 वर्षीय मैत्रिणीसोबत दुचाकीने पोगांव पाईपलाईन परिसरात फिरायला गेला होता. रात्री घरी परतताना बंदूक, चाकूच्या धाकाने पाच नराधमांनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -