मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा मुंबईतून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवलेल्या मतदारसंघातून नगमा यांना रणांगणात उतरण्याची इच्छा आहे.
2014 मध्ये प्रिया दत्त यांना लोकसभा निवडणूक लढवलेल्या उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघावर नगमा यांनी पहिला दावा सांगितला आहे. भाजपच्या पूनम महाजन या उत्तर मध्य मुंबईतून खासदार आहेत. त्यामुळे नगमा पूनम महाजन यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
'मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी वांद्र्यात लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतलं, करिअर केलं. त्यामुळे इथे माझा पहिला दावा आहे' अशा शब्दात नगमा यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची मनिषा व्यक्त केली.
उत्तर मध्य मुंबईतील जागेवरुन निवडणूक न लढण्याचा निर्णय प्रिया दत्त यांनी घेतला आहे. त्यामुळे या जागेवर कृपाशंकर सिंह, नगमा यांची नाव चर्चेत आहेत.
नगमा यांनी 1990 साली 'बागी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर किंग अंकल, कुंवारा, चल मेरे भाई यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्या झळकल्या. तेलुगू, कन्नड आणि तमिळ भाषेतही त्यांची समांतर कारकीर्द सुरु होती. 2005 मध्ये त्यांनी आपला मोर्चा भोजपुरी चित्रपटांकडे वळवला. 2007 मध्ये त्यांनी 'थांब लक्ष्मी थांब' या मराठी सिनेमातही मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर मात्र त्यांची चित्रपट कारकीर्द थांबली.
नगमा यांनी 2014 मध्ये मध्य प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभवाचा धक्का बसला.
प्रिया दत्त यांच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची नगमाची इच्छा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2019 07:54 PM (IST)
'मी महाराष्ट्राची मुलगी आहे. मी वांद्र्यात लहानाची मोठी झाले, शिक्षण घेतलं, करिअर केलं. त्यामुळे इथे माझा पहिला दावा आहे' अशा शब्दात नगमा यांनी उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची मनिषा व्यक्त केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -