भिवंडी : भिवंडी शहरातील गैबिनगर येथील एका 40 वर्षीय महिलेच्या पोटातून पाच किलो वजनाचे ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करुन काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे. स्त्री रोगतज्ञ डॉ सुप्रिया अरवारी यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी करुन दाखवली.

सुप्रीम हॉस्पिटलच्या स्त्री रोगतज्ञ डॉ सुप्रिया अरवारी यांच्याकडे ही महिला पोटात वेदना होत असल्याची तक्रार घेऊन येत असतं. मागील सात आठ वर्षांपासून पोटात वेदना होत होत्या. मात्र माघील दोन महिन्यांपासून या महिलेच्या पोटात वेदना अधिक तीव्र झाल्याने महिलेच्या विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीअंती पोटात गाठ असल्याचे समजले.

आणखी वाचा : सततची डोकेदुखी, ब्रेन ट्यूमर तर नाही?

या गाठीमुळे महिलेचे पोट जणू नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेसारखे दिसून येत होते. परंतु महिलेची आर्थिक परिस्थिती सक्षम नसल्याने ही महिला सात ते आठ वर्ष पोटात या वेदना सहन करीत होती. मात्र माघील दोन महिन्यांपासून वेदना सहन होत नसल्याने महिलेची प्रकृती खालावली. यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

सुप्रिम हॉस्पिटलच्या डॉ सुप्रिया अरवरी यांनी डॉ शैलेंद्र जाधव, डॉ अजयकुमार भास्करन, डॉ ए आर खान यांच्या मदतीने सदर महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात पोटातून सुमारे 11 इंच लांबी 9 इंच रुंदी आणि 9 इंच उंचीचा 5 किलो वजनाचा ट्यूमर बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं. शस्त्रक्रियेनंतर महिला सुरक्षित असून तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉ सुप्रिया अरवारी यांनी दिली आहे.

सलग अर्धा तास फोनवर बोलल्याने ब्रेन ट्यूमरचा धोका