भिवंड (ठाणे) : भिवंडी दुर्घटनेत एक चमत्कार घडला आहे. दोन मजल्यांची इमारत कोसळूनही अवघ्या 7 महिन्यांचं बाळ या आपत्तीमधून सहीसलामत वाचलं आहे. अब्दुल रेहमान असं या मुलाचं नाव असून, त्याच्या जन्मदात्रीचा मात्र यात मृत्यू झालाय. अपघातानंतर सुमारे 6 तासांनी या बाळाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं आहे.

 

काय आहे घटना?

 

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे 8 जणांना जीव गमवावा लागला. काळी साडे 9 च्या सुमारास शहरातल्या गैबी नगर भागातली एक इमारत कोसळली. ज्याखाली किमान 30 ते 35 जण अडकले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आलं. पण त्याआधीच 8 जणांचा मृत्यू झाला.

 

एकाच कुटुंबातील तीन भावांचा मृत्यू

 

दुर्दैवाची गोष्ट ही की एकाच कुटुंबातल्या तीन भावांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांच्यावर भिवंडीतल्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहे. दरम्यान भिवंडीतल्या या घटनेनं पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरवणीवर आला आहे.

 

पाहा व्हिडीओ -