ते म्हणाले की, हिम्मत असेल तर संघाने समोर येऊन मनुस्मृतीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दाखवावी. एनपीआरला राज्य सरकार थांबवू शकते, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात एनपीआर थांबवावे. जर महाराष्ट्र सरकारने तसे केले नाही, तर आम्हाला त्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल, मोर्चे काढावे लागतील असा इशारा आझाद यांनी दिला. सीएए आणि एनआरसी हे कायदे एका मोठ्या कटाचा भाग असल्याची टीका त्यांनी केली. सीएए विरोधात संघर्ष करत राहू, कुठल्याही नागरिकावर अन्याय होऊ देणार नाही, असंही आझाद म्हणाले.
संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा; अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला न्यायालयाची परवानगी
देशावर अनेक संकटे आजवर आली. मात्र, देशाच्या जनतेने त्यांना धूळ चारली. आज जी आंदोलन सुरू आहेत त्यांना माझा नमन आहे, ते जगाला दाखवत आहे की या देशात लोकशाही जिवंत आहे. आज मनुस्मृती आणि राज्यघटनेमध्ये संघर्ष आहे. आणि त्यात राज्यघटनाच जिंकणार, असेही ते म्हणाले.
आरक्षणाला विरोध करण्याऐवजी संघ प्रमुखांनी आरक्षणच्या मुद्द्यावर माझ्याशी उघड चर्चा करावी असं आव्हानही आझाद यांनी दिलं आहे. सभेच्या अखेरीस आझाद यांनी संपूर्ण देशाला मुस्लिमांचे आभार मानण्याचे आग्रह केला. मुस्लिमांनी तीन तलाक, कलम 370 आणि बाबरी मशिदीसाठीही रस्त्यावर उतरून आंदोलन केले नाही. मात्र, जेव्हा नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून राज्य घटनेवर संकट आले तेव्हा मुस्लिम बाहेर निघाले आणि आंदोलन सुरू केले, असं ते म्हणाले.
विशेष म्हणजे न्यायालयाने भीम आर्मीला 3 तासांसाठी मेळाव्याची परवानगी दिली होती. मात्र, चंद्रशेखर आझाद अखेरच्या एका तासासाठीच मेळाव्यात आले. या मेळाव्यात दलित तरुणांच्या तुलनेत मुस्लिम तरुण जास्त संख्येत उपस्थित होते.