मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे मुंबईतील शिवडीमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. परंतु यावेळी भीम आर्मी आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला व त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांच्या सुरक्षेत हा कार्यक्रम पार पडला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

संभाजी भिडे कार्यक्रमातून मार्गस्थ होत असताना भीम आर्मी आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी धारकरी आणि पोलिसांच्या सुरक्षेत भिडे रवाना झाले. कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालणाऱ्या, घोषणाबाजी करणाऱ्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या संपूर्ण घटनेमुळे शिवडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सबंधित बातम्या 

पुणे : संभाजी भिडे कार्यकर्त्यांसह वारीत सहभागी

तुम्ही वांग्याचं भूत केलं, तुमचं तोंड बघायचं नाहीय : संभाजी भिडे

संभाजी भिडे आणि नरेंद्र पाटील यांची एसटीत भेट

वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे आज कोर्टात हजर राहणार | नाशिक | एबीपी माझा


संभाजी भिडे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी कोल्हापुरात!