वसई : मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरातील आझाद नगर भागातून पीडित मुलीचं अपहरण झालं होतं.
अपहरणाच्या तीन दिवसांनंतर म्हणजे 12 जानेवारीला एका नाल्यात पीडितेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी या हत्येचा तपास केला असता बलात्कार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे.
पीडित चिमुरडीचे आरोपींपैकी एकाच्या घरी येणं जाणं होतं. तिघा आरोपींनी याचाच फायदा घेत चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केलं आणि गँगरेप केला. पोलिसांनी आझाद नगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना शोधून काढलं आहे.