Bhagat Singh Koshyari Controversy LIVE: राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद, पाहा प्रत्येक अपडेट
भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत सर्वपक्षीय आक्रमक झाले आहेत
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 Jul 2022 05:17 PM

पार्श्वभूमी
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर...More
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे. राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षमराष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे. इतर महत्वाच्या बातम्या'महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोकेवाले कोणत्या झाडी डोंगरात लपलेत'; राज्यपालांविरोधात संजय राऊत आक्रमक, केले धडाधड ट्वीट'गुजराती, राजस्थानी गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही', राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधक आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी राज्यभरातून दहा लाख पत्र पाठविण्यात येणार
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी आणि त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने 1 ऑगस्ट पासून दहा लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी दिली.