मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत महापालिका गटनेत्यांच्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे मार्चचे पगारही टांगणीवर पडले आहेत. मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टच्या आर्थिक स्थितीबाबत कृती आराखड्यावर कोणतीही ठोस चर्चा झाली नाही. बेस्टच्या कृतीआराखड्याबाबत निश्चित निर्णय झाले नाहीत. त्यामुळे पुढच्या महिन्यातही बेस्ट कर्मचाऱ्यांना उशीराच पगार मिळण्याची शक्यता आहे. २९ तारखेला कृती आराखड्याबाबत पुन्हा एकदा बैठक होणार. या बैठकीत बेस्ट कृती आराखडा मांडला जाईल असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. मात्र, कृती आराखडा निश्चित झाल्यानंतरही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार लांबणीवरच पडण्याची शक्यता आहे. मात्र, मार्चचे पगार वेळेवर देऊ, असं आश्वासन महापौरांनी दिलं आहे. पालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा  शिवसेना - तृष्णा विश्वासराव - अरविंद भोसले भाजप गणेश खणकर श्रीनिवास त्रिपाठी काँग्रेस सुनील नरसाळे