मुंबई : मुंबईतील बेस्ट बस प्रवासाच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. यानुसार बेस्टचं किमान भाडं एका रुपयानं कमी होण्याची शक्यता आहे.

 
गेल्या काही वर्षांत प्रवाशांची रोडावलेली संख्या आणि त्यामुळे घसरत चाललेलं उत्पन्न यावर उपाय काढण्यासाठी बेस्ट प्रशासन भाडेसूत्रात बदल करण्याच्या विचारात आहे. हे भाडं कमी झाल्यास रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करणारे प्रवासी बेस्टकडे वळतील असा विश्वास प्रशासनाला वाटतो.

 
विशेष म्हणजे बदललेल्या भाडेसूत्रानुसार वातानुकूलित बसचे दरही कमी होतील. सध्या बेस्टच्या प्रवासी संख्येत कमालीची घट झाली असून ती 28 लाखांवर आली आहे. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट प्रशासन अनेक मार्ग अवलंबताना दिसत आहे.