हेडलाईन्स

सांगली : मिरजेहून 50 वॅगन पाणी घेऊन पाणी एक्स्प्रेस लातूरच्या दिशेने रवाना

-----------------------------------------------------------

पुण्यातलं '5 लाखांत घर योजना' प्रकरण : सचिन अग्रवालविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हा दाखल, पोलीस उपनिरीक्षकांची माहिती

-----------------------------------------------------------

यवतमाळ : पुसद-दिग्रस मार्गावरील विठाळाजवळ कापूस गठाणी घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट, लाखोंचं नुकसान

-----------------------------------------------------------

पुण्यातील 'आपलं घर' प्रकरण : भाजप खासदार किरीट सोमय्या शुक्रवारी पुण्यात जाऊन पोलिस आणि म्हाडासोबत बैठक घेणार

-----------------------------------------------------------

मराठवाड्यातील दुष्काळ मानवनिर्मित आहे - राज ठाकरे

आज ट्रेनने पाणी आणलं गेलं, असे किती दिवस आणणार? हा प्रश्न आहे - राज ठाकरे

सरकारने बांधलेल्या 33 हजार विहिरी आहेत कुठे? - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुष्काळ दौऱ्यासाठी रवाना

-----------------------------------------------------------

सातारा शहरात मुसळधार पाऊस

-----------------------------------------------------------

परभणी - कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचा डोहात पडून मृत्यू, मानवत तालुक्यातील मगर सावंगी येथील घटना

-----------------------------------------------------------

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील टायगर झोनमध्ये आग

-----------------------------------------------------------

तृप्ती देसाई 22 तारखेला त्र्यंबकेश्वर गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणार

-----------------------------------------------------------

उस्मानाबाद - 50 हजारांची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक शाहुराज भिमाळेंना अटक, शैक्षणिक संस्थेविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रारदाराकडून घेतली लाच

-----------------------------------------------------------

1. पुण्यात 5 लाखात घराचं स्वप्न दाखवणाऱ्या मॅपल बिल्डरवर फौजदारी कारवाई करा, म्हाडाच्या सीईओंना आदेश, जाहिरातीत झळकणाऱ्या गिरीश बापटांना मात्र क्लीन चीट

2. कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी, कोल्हापुरात खळबळ, पोलिसात गुन्हा दाखल

3. पंकजा मुंडेंच्या पतीची औरंगाबादच्या एमआयडीसीत रॅडिको डिस्टीलरी, बियर निर्मितीसाठी जायकवाडीच्या पाण्याचा वापर केल्याचा राष्ट्रवादीचे आरोप

4. हौसेपोटी नव्हे कामं पूर्ण झाल्याच्या आनंदाचा सेल्फी, असंवेदनशीलतेच्या आरोपावर पंकजांचं उत्तर, आजारपणामुळं मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती

5. मराठवाड्यात पुढची 5 वर्ष साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचा विचार, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य, दुष्काळवाड्यावर रामबाण उपाय

6. डान्सबारचे परवाने अजूनही का दिले नाहीत?, सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारला फटकारलं, 25 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

7. 50 वॅगनऐवजी लातूरला आज 25 वॅगन पाणीच रवाना होणार, 25 लाख लिटर पाणी उतरुन घेण्यास प्रशासन असमर्थ

8. कोहिनूर हिरा चोरीला गेला नाही तर ब्रिटनला भेट दिला, सुप्रीम कोर्टात सरकारचं प्रतिज्ञापत्र, मालकीच्या वादाला आश्चर्यकारक वळण

9. जम्मूतील राजौरी विद्यापीठात काश्मिरी आणि जम्मूचे विद्यार्थी भिडले, चार वाहनं जळून खाक तर 8 विद्यार्थी जखमी

10.  मुस्लिम तरुणांना आकर्षित करण्यासाठी संघाचे प्रयत्न, अँटी टेररिस्ट युथ फ्रंट स्थापन करणार, राष्ट्रीय मुस्लिम मंचची योजना

एबीपी माझा वेब टीम