मुंबई : मुंबईकरांच्या खिशाला आजपासून (गुरुवार) कात्री लागणार आहे. कारण, बेस्ट बसची भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे. मुंबई महापालिकेनं यापूर्वीच ही भाडेवाढ मंजूर केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. या भाडेवाढीत पहिल्या चार किलोमीटरपर्यंत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र चार किलोमीटरनंतर एक रुपयापासून ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ सुचवण्यात आली आहे. सोबतच विद्यार्थ्यांसह इतर पासच्या भाड्यातही चांगलीच वाढ करण्यात आली आहे. तेव्हा आता बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. अशी असणार भाडेवाढ :
  • ६ किमीसाठी सध्या भाडे- १४ रु, प्रस्तावित भाडे- १५ रु.
  • ८ किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- १८ रु.
  • १० किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- २२ रु.
  • पासच्या किंमतीतही पहिल्या चार किमीसाठी कोणतेही बदल नाही. त्यापुढे ४० रु. ते ३५० रु भाडेवाढ प्रस्तावित.
  • शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत चार किमीपर्यंत बदल नाहीत, त्यापुढे ५० ते १०० रु वाढ प्रस्तावित.