Mumbai Airport: इंडिगो एअरलाईन (Indigo Airline) आणि मुंबई विमानतळ (Mumbai Airport) प्रशासनाला Bureau of Civil Aviation Security अर्थात BCASनं दणका दिला आहे. मुंबई विमानतळावर विमानाच्या शेजारीच बसून प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगोला 1 कोटी 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर मुंबई विमानतळाला 60 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. 14 जानेवारी रोजी गोवा-दिल्ली विमान गोव्याहून निघतानाच खूप लेट झालं होतं. त्यानंतर दिल्लीत धुकं होतं म्हणून विमान मुंबईला वळवण्यात आलं. हताश झालेले प्रवासी विमानाबाहेरच बसून गेले, आणि काहींनी तर तिथेच जेवण्यास सुरुवात केली. यावर कारवाई करत, BCASनं इंडिगोवर वेळेत प्रवाशांची सोय न केल्याचा आणि परिस्थितीचं गांभीर्य न कळल्याचा ठपका ठेवला आहे.  


यासोबतच BCAS नं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ला एअरस्ट्रीपजवळ प्रवाशांनी जेवण केल्याप्रकरणी 60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर डीजीसीएनं या प्रकरणी मुंबई विमानतळ ऑपरेटर एमआयएलला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 


बजावलेली कारणे दाखवा नोटीस 


यापूर्वी बीसीएएसनं इंडिगो आणि एमआयएएलला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. प्रत्यक्षात रविवारी (14 जानेवारी) इंडिगोचे गोवा-दिल्ली विमानाला प्रदीर्घ विलंब झाल्याप्रकरणी मुंबई विमानतळावर उतरताच अनेक प्रवासी इंडिगोच्या विमानातून बाहेर आले आणि एअरस्ट्रीपजवळ बसले. यावेळी काही प्रवासी जमिनीवर बसून जेवतानाही दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) नं जारी केलेल्या नोटीसनुसार, इंडिगो आणि एमआयएएल दोन्ही परिस्थितीचा अंदाज घेण्यास आणि विमानतळावर प्रवाशांसाठी योग्य व्यवस्था करण्यात सक्रिय नव्हते. नोटीसमध्ये पुढे असं म्हटलं की, इंडिगोनं सुरक्षा तपासणी प्रक्रियेचं पालन न करता प्रवाशांना विमानतळावरील 'एअरस्ट्रीप'वर उतरण्याची परवानगी दिली.


यासोबतच BCAS नं मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) ला एअरस्ट्रीपजवळ प्रवाशांनी जेवल्याप्रकरणी 60 लाख रुपयांचा दंड ठोठावला. तर डीजीसीएनं या प्रकरणी मुंबई विमानतळ ऑपरेटर एमआयएलला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतलेली बैठक 


वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, मुंबई विमानतळाच्या 'एअरस्ट्रीप'वर प्रवाशांनी जेवण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रालयातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.