महेशने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बॅंकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आत्महत्या करत असल्याचं महेशने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलं होतं. 'माझ्या मरणासाठी जबाबदार बँक कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी. आई, आबा, अक्का माफ करा' असं महेशने लिहिलं.
बारामती तालुक्यातल्या काटेवाडीमध्ये ही घटना घडली. बारामतीतील पोलिस ठाण्यात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.