- अब्दुल रझाक मोहम्मद सय्यत (स्वत:)
- रुक्साना सय्यद (पत्नी)
- नूरजहाँ सय्यद (बहीण)
- आरिफ सय्यद (मुलगा)
मुंबईत घबाड... एकाच कुटुंबाकडून 2 लाख कोटींची संपत्ती जाहीर
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2016 05:06 PM (IST)
मुंबई : मुंबईतल्या एका कुटुंबाने चक्क 2 लाख कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मुंबईतील वांद्र्यामध्ये राहणाऱ्या अब्दुल रज्जाक मोहम्मद सय्यद आणि त्यांच्या कुटुंबाने हा खजिना जाहीर केल्याची माहिती आयकर विभागाने दिली. कमवण्याचे मर्यादित स्त्रोत असताना एका कुटुंबाकडे एवढी संपत्ती कशी येऊ शकते, अशी शंका आयकर विभागाने उपस्थित केली आहे. त्यामुळे सय्यद कुटुंबीयांच्या चारही सदस्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची चौकशी केली जाणार आहे. दुसऱ्यांची काळी संपत्ती लपवण्यासाठी सय्यद कुटुंबियांचा वापर करण्यात आल्याचा आयकर विभागाला संशय आहे. सरकारने मध्यंतरी काळी संपत्ती जाहीर करण्याची योजना आणली होती. त्या योजनेतंर्गत सय्यद कुटुंबाने ही संपत्ती घोषित केली होती. मात्र संशय आल्यामुळे सरकारने सय्यद कुटुंबाबद्दल गुप्तता बाळगली होती. कुणा-कुणाच्या नावावर 2 लाख कोटींची संपत्ती ?