मुंबई : लवकरच 20, 50 च्या नव्या नोटा चलनात येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कुणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण जुन्या 20, 50 च्या नोटा देखील चलनात राहणार आहेत.
20 च्या नवीन नोटा चलनात येतील. त्यावर दोन्ही बाजूंनी 'L' अक्षर असेल. तसेच जुन्या 20, 50 च्या नोटादेखील चलनात राहतील असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
50 च्या नव्या नोटेवर कुठलंही अक्षर नसेल. तर जुन्या नोटा चलनात राहतील, असं आरबीआयने सांगितलं आहे.
पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र जुन्या नोटाही चलनात राहणार असल्यामुळे नागरिकांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही, असं आरबीआयने म्हटलं आहे.