Bandra Building Collapsed: मुंबईतील वांद्रे येथील बेहराम नगरमधील पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामध्ये अडकलेल्या सहा जणांची सुटका करण्यात बचाव पथकाला यश आलं आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव पथक आणि सहा अॅम्ब्युलन्स पोहोचल्या आहेत.
वांद्रे येथील बेहराम पाडा या झोपडपट्टीचा परिसरातील ही इमारत कोसळताच परिसरात एकच खळबळ माजली. सुरुवातीला या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली पाच जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव कार्यास सुरुवात करुन ढिगाऱ्याखालून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढलं. यापैकी चौघांना व्हीएन देसाई रुग्णालयात तर इतर दोघांना वांद्रे भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.