मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया आणि त्याच्या साधनांचं वरळीत प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महासिटी कंपोस्ट या राज्य सरकारच्या उपक्रमाची माहिती दिली. तर उद्धव ठाकरे यांनी प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली.
अमिताभ बच्चन यांनी यावेळी मंगळवारच्या पावसात रस्त्यावर उतरुन लोकांना मदत करणाऱ्या महापालिका कर्मचारी आणि पोलिसांचे कौतुक केलं. शिवाय त्यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करावी, असंही आवाहन केलं.
प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी आणा : उद्धव ठाकरे
आपल्याकडे संकटं आली की शहाणपण येतं. मात्र प्रत्येक शहाणपणासाठी संकटाची गरज नसते. मुख्यमंत्र्यांनी प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी आणण्याचा विचार करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
दरम्यान कचरा व्यवस्थापन कसं करायचं ते प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगणाऱ्या महापालिकेचं उद्धव ठाकरेंनी कौतुकही केलं.
प्लॅस्टीकवर पूर्णपणे बंदी घाला, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Sep 2017 11:40 PM (IST)
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उपस्थिती होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -