मुंबई: दिवाळीत उडत्या दिव्यांच्या कंदिलांवर बंदी घालण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. अग्निशमन दलाकडून दिवाळीच्या काळात दिव्यांचे कंदील उडवू नये यासंदर्भातलं पत्र पोलिसांना देण्यात आलं होतं.
मुंबईत उडत्या दिव्यांच्या कंदिलांचं फॅड वाढत चाललं आहे. अशा वेळी दिवाळीत पेटत्या कंदिलांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. ती टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून दिवाळीत पेटत्या दिव्यांच्या कंदीलांना बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत पेटते कंदील उडवता येणार नाही.
अशा प्रकारच्या कंदील विक्री करणाऱ्यांवर, उडविणाऱ्यांवर व विक्री साठा करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात येणार आहे.