मुंबई : ‘बालिका वधू’ आणि ‘दिल ले दिल तक’ या हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कारचा भरधाव वेगामुळे अपघात झाला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या श्रीजी हॉटेलसमोरच हा अपघात झाला.
या अपघातात तीन ते चार गाड्यांचे नुकसान झाले असून सिद्धार्थची बीएमडब्ल्यू कार थेट दुभाजकावर चढली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सिद्धार्थ किरकोळ जखमी झाला आहे.
बेजबाबदारपणे भरधाव वेगाने गाडी चालवल्यामुळे ओशिवरा पोलीस ठाण्यात सिद्धार्थ शुक्लाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.