मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर काढताना महापालिका अधिकाऱ्यांकडून ते फाटल्याने ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. बॅनर काढताना महापालिका अधिकाऱ्यांनी बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ सायन प्रतीक्षा नगरमध्ये शिवसैनिकांनी रस्त्यावर बसून आंदोलन केलं.  


गुरूवारी, 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने सायन प्रतीक्षा नगर येथे शिवसेना शाखा क्रमांक 173 येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे बॅनर लावण्यात आले होते. त्याचवेळी मुंबई महापालिका कर्मचार्‍यांकडून विविध पक्षांचे लावण्यात आलेले बॅनर काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.


सायन प्रतीक्षा नगर भागातले बॅनर काढण्यात येत असताना त्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्ताने लावण्यात आलेले बॅनरही काढण्यात आले. पण हे करत असताना त्यातील एक बॅनर फाटल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं.


महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. सायन प्रतीक्षा नगरमधील रस्त्यावर बसून ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला गेला. बाळासाहेबांच्या जयंतीचे बॅनर काढण्यात आले आणि त्यातला एक बॅनर फाडल्याने बाळासाहेबांचा अपमान महापालिका अधिकाऱ्यांनी केला असं या शिवसैनिकांचे म्हणणं आहे. 


ही बातमी वाचा :