मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीवरुन सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सार्वजनिकरित्या येणं टाळलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री एकटेच शिवतीर्थावर पोहोचले.
स्मृतीदिनानिमित्त बाळसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर जाण्याआधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महापौर बंगल्यावर भेट झाली. ही भेट जवळपास 15 मिनिटांची होती. यानंतर दोघे शिवाजी पार्कवर जातील, अशी अपेक्षा होती. परंतु मुख्यमंत्री एकटेच शिवाजी पार्कवर गेले. तिथे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना सामोरे गेले. यावेळी दिवाकर रावते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना पुढे येण्यास सांगत असल्याचंही दिसलं. परंतु आदित्य ठाकरे आले नाहीत.
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिल्यानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र यावेळी उद्धव ठाकरे आलेच नाहीत. युतीतल्या तणावामुळे उद्धव ठाकरेंनी सार्वजनिकरित्या मुख्यमंत्र्यांबरोबर एकत्र येण्याचं टाळल्याची चर्चा रंगली आहे.
महापौर बंगल्यावर मुख्यमंत्री-उद्धव ठाकरेंची भेट, मात्र शिवतीर्थावर फडणवीस एकटेच गेले!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Nov 2018 01:23 PM (IST)
स्मृतीदिनानिमित्त बाळसाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर जाण्याआधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महापौर बंगल्यावर भेट झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -