मुंबई : 'मातोश्री'वर जाऊन मी स्वतः शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना युतीचा प्रस्ताव दिला. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं. मग मी मातोश्रीवर गेल्याचं खोटं बोललो का, असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.

..तर राज ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर जाणार?


 


मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. छोटा भाऊ म्हणून आम्ही युतीसाठी तयार आहोत. युती झाल्यास आमच्या सध्याच्या जागा आम्हाला द्या बाकी काहीही नको, असा प्रस्ताव मी 'मातोश्री'वर दिला, असं नांदगावकरांनी सांगितलं.

राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास


 

दरम्यान युतीची वेळ गेलेली नाही, मनसे अजूनही आशावादी आहे. शिवसेना विचार करेल, अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.

मनसेसोबत युती अशक्य, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती


 

उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, मात्र कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

संबंधित बातम्या :


दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील


राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर


राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास


मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत