Baba Siddique Case : अलीकडेच मुंबईत अजित पवार गटाचे नेते आणि मायानगरीचा प्रसिद्ध चेहरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले. आता बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचने शुक्रवारी सर्वात मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बाबा सिद्दीकीच्या कटात सहभागी असल्याचा आणि सपोर्ट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 नवीन आरोपींना अटक केली आहे.


अटक आरोपींची नावे...


1. नितीन गौतम सप्रे (32) डोंबिवली
2. संभाजी किशन परबी (44) अंबरनाथ
3. राम फुलचंद कन्नौजिया (43) पनवेल
4. प्रदीप तोंबर (37) अंबरनाथ
5. चेतन दिलीप पारधी (33) अंबरनाथ


पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीन आणि राम कनोजिया हे या सर्व आरोपींचे म्होरके होते. यांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्रे पुरवली होती. दोन्ही शूटर धर्मराज कश्यप आणि शिवकुमार यांच्या संपर्कात होते, असे पोलिसांनी सांगितले आहे. 2 महिने कर्जतमध्ये आरोपी त्यांच्यासोबत राहत होते.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील अटक करण्यात आलेले आरोपी झिशान अख्तर आणि शुभम लोणकर यांच्या संपर्कात होते. अटक आरोपी नितीनवर खून, हाफ मर्डर आणि आर्म्स एक्ट असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी राम कुमार यांच्यावरही काही आरोप आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुमारास या आरोपींना शस्त्रे देण्यात आली होती.


बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुलगा झीशान सिद्दिकी याने एक निवेदन जारी केले. त्याने लिहिले होते की, माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांच्या जीवनाचे आणि घरांचे रक्षण करताना आपले प्राण गमावले. आज माझे कुटुंब दु:खी झाले आहे, परंतु त्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जाऊ नये. मला न्याय हवा आहे, माझ्या कुटुंबाला न्याय हवा आहे.






हे ही वाचा -


Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांची हत्या का झाली?; झिशानच्या ट्विटनंतर वेगवान हालचाली, पोलिसांकडून नवीन अँगलने तपास सुरु