परिवहन विभागाच्या कारवाईविरोधात भिवंडीत रिक्षा चालकांचा संप
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 12:37 PM (IST)
भिवंडी: परिवहन विभागाने बेशिस्त रिक्षाचालकांवर सुरू केलेल्या कारवाईविरोधात भिवंडीतील रिक्षाचालकांनी आज एकदिवसीय संप पुकारला आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र रिक्षासेवा सुरू ठेवण्यात आली आहे. परिवहन विभागाने रिक्षांवरील कारवाई तातडीने थांबवण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे. मागील महिनाभरात भिवंडी, कल्याण आणि ठाण्यात बेशिस्त आणि मुजोर रिक्षाचालकांनी एसटीचालक आणि पोलिसांना मारहाण केल्याच्या सलग चार घटना घडल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते कारवाईचे आदेश दिले. परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतर आठवडाभरात कल्याणमध्ये २५०, तर भिवंडीत जवळपास २०० रिक्षा जप्त करुन त्या चक्काचूर करण्याची कारवाई केली गेली. दरम्यान, भिवंडीत रस्त्यांवरील खड्डयांचं कारणही या संपासाठी पुढे करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या: