VIDEO : तुर्भे स्थानकावर तरुणीला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 23 Feb 2018 12:13 PM (IST)
नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात काल (गुरुवार) ४३ वर्षीय इसमानं एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईच्या तुर्भे रेल्वे स्थानकात काल (गुरुवार) ४३ वर्षीय इसमानं एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ही घटना घडली. नरेश जोशी असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नरेश हा नवी मुंबईच्या घणसोली परिसरात राहतो. काल सकाळी साडे अकराच्या दरम्यान एक तरुणी तुर्भे स्थानकात लोकलची वाट पाहत उभी होती. त्याचवेळी आरोपी नरेश जोशी याने मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारानंतर आरपीएफ पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला वाशी जीआरपीकडे सोपवलं असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. VIDEO :