वसई (ठाणे) : ट्रॅफिक पोलिसाला मारहाणीची घटना वसईत घडली आहे. काळू विठ्ठल मुंडे असे या पोलिसाचे नाव आहे. वसईतील पार्वती क्रॉस परिसरात सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


या मारहाणीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सोहेल मेनन अस मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

सोहेल याची सिग्नल तोडण्यावरुन पोलिसांशी बाचाबाची झाली आणि त्याने चक्क पोलिसाच्या श्रीमुखात लगावली. एकदा मारहाण करुन आरोपी सोहेल शांत झाला नाही, तर तो वारंवार मारहाण करत होता.

धक्कादायक बाब म्हणजे भर चौकात इतकी गर्दी असताना एकही व्यक्ती पोलिसाला बचावण्यासाठी पुढे सरसावला नाही. त्यात आणखी धक्कादायक म्हणजे, मनिकपूर पोलिसांनी केवळ  अदखलपात्र गुन्हा अशी नोंद केली असून, अजूनही मारहाण करणारा आरोपी मोकाट आहे.

पाहा व्हिडीओ :