बदलापूरच्या उपनगराध्यक्षांवर तलवारीने प्राणघातक हल्ला!
एबीपी माझा वेब टीम | 28 Jan 2017 11:26 PM (IST)
बदलापूर : बदलापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष शरद तेलींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात शरद तेली थोडक्यात बचावले, असून ते किरकोळ जखमी झाले आहेत. भाजपचे शरद तेली सत्यनारायणाच्या पूजेसाठी मित्राच्या घरी गेले होते. तिथून परतत असताना शनि मंदिर परिसरात शरद तेलींवर हल्ला करण्यात आला. सुदैवानं या हल्ल्यात तेलींना मोठी दुखापत झाली नाही. दरम्यान, घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.