मुंबई : कल्याणच्या बेतुरकरपाडा परिसरात वयोवृद्ध दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
कल्याणमधील बेतुरकरपाड्यातील बेतुरकर दाम्पत्य रात्री घराच्या अंगणात झोपलं होतं. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 65 वर्षीय लहु बेतुरकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी जया गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान या हल्ल्यात मृत्यू झालेले लहु बेतुरकर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची होती. बेतुरकर दाम्पत्यावर झालेला हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.