हेडलाईन्स
-------------------
1 लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की, साहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकरांचं कृत्यं सीसीटीव्हीत कैद
-----------------
2 लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यामध्ये जुंपली, पोलिसांनी मारहाण केल्याचा कार्यकर्त्याचा आरोप, तक्रार दाखल न झाल्यामुळं संशय बळावला
-----------------
3 मुंबईतल्या बोहरी मशिदीच्या कंपाऊंडचं काम सुरु असताना भिंत कोसळली, काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
-----------------
4 गोव्यात भाजपला शह देण्यासाठी सेनेचं वेलिंगकरांना साकडं, संजय राऊतांची वेलिंगकरांशी अडीच तास चर्चा, तर भाजपला हरवण्याचा वेलिंगकरांचा निर्धार
-----------------
5 विनोद तावडेंच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल, पक्षाच्या अविश्वासामुळं 40 वर्षांची तपश्चर्या वाया, जाहीर कार्यक्रमात टोला
-----------------
6 सिंचन प्रकल्पांच्या निविदा रद्द केल्या तरी गुन्हे रद्द नाही, गैरव्यवहाराची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं, अजित पवार आणि तटकरेंच्या अडचणीत भर
-----------------
7 कल्याणमध्ये वयोवृद्ध पतीपत्नीवर प्राणघातक हल्ला, पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी, पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा अंदाज
-----------------
8 काश्मीरमध्ये घुसलेल्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा, ईदमध्ये घातपात घडवण्याचा कट उधळला, 1 जवान शहीद
-----------------
एबीपी माझा वेब टीम