कल्याण : भाजपचे कल्याण शहर उपाध्यक्ष शत्रुघ्न भोईर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर शनिवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
शनिवारी रात्री साडे 11 च्या दरम्यान 10 ते 12 अज्ञात हल्लेखोरांनी भोईर यांच्या घरावर हल्ला करत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धारदार शस्त्रांसह लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत शत्रुघ्न भोईर यांच्यासह त्यांचे बंधू भरत भोईर आणि बहिण सुनीता भंडारी हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खडकपाड्यातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.