मुंबई : एटीएम व्यवस्था सुरळीत होण्यासाठी आणखी 10 दिवस जातील, अशी माहिती NCR इंडियाचे एमडी नवरोज दस्तूर यांनी दिली. NCR इंडिया कंपनी विविध बँकांचे एटीएम चालवते.
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने आधीच लोकांची धावपळ सुरु झाली आहे. त्यात एटीएम सुरळीत होण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचे दिसते आहे.
“एटीएममधून पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी 10 दिवसांचा कालावधी लागेल. एटीएममधून दोन हजाराची नोट काढण्यासाठी काही तांत्रिक बदल करावे लागतील. रकमेची ज्याप्रकारे अचानक मागण वाढली, त्यानुसार सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत.”, अशी माहिती विविध बँकांच्या एटीएममध्ये पैसे पुरवणाऱ्या NCR इंडियाच्या एमडी नवरोज दस्तूर यांनी दिली.
काळ्या पैशाविरोधातील लढाई आणखी मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर देशबरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झाले.