मुंबई : युवासेवा प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशावेळी आदित्य ठाकरेंचे काका मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांना मदत करु शकतात. आदित्य ठाकरे निवडणूक लढत असलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल मनसेच्या 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीत वरळी विधानसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. वरळीतून मनसेचे संतोष धुरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघात विविध कामं करत आहे. त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशी अपेक्षा होती.
- मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलासह 27 उमेदवार मनसेकडून जाहीर
- मी निवडणूक लढवणार, आदित्य ठाकरेंची घोषणा, वरळीतून विधानसभेच्या मैदानात उतरणार
वरळीतून मनसेने उमेदवार दिला तर मराठी मतांची विभागणी होऊ शकते. याचा फटका आदित्य ठाकरेंना बसू शकतो. राज ठाकरे कार्यकर्त्यांशी चर्चा करुन वरळीत उमेदवार देण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत निश्चित होईल की आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार की नाही.
आजपर्यंत शिवसेना आणि शिवसैनिकांनी सामान्य लोकांसाठी राजकारण आणि समाजकारण केलं. याच समाजकारणासाठी मी निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात केली होती.
VIDEO | Majha Vishesh | युतीच्या बंडखोरांना कसं शांत करणार सेना-भाजप? | माझा विशेष
संबंधित बातम्या
- Congress 2nd List | काँग्रेसची दुसरी यादी, 52 उमेदवारांची उमेदवारी जाहीर
- Shivsena Candidate List | शिवसेनेच्या पहिल्या यादीत 70 उमेदवारांचा समावेश
- ऐरोलीच्या मोबदल्यात शिवसेनेचं 'कल्याण', मात्र बाहेरील उमेदवारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी