मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मनसेकडून 27 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. या 27 जणांमध्ये मंत्रालयात विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पूत्र नरेंद्र पाटील यांचा समावेश आहे. नरेंद्र धर्मा पाटील यांना सिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरुद्ध मनसेनं उमेदवार दिलेला नाही. दादर-माहीम मतदारसंघातून मनसेने नितीन सरदेसाई यांचा पत्ता कापत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ईव्हीएमविरुद्ध राज ठाकरे यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. निवडणुका ईव्हीएमद्वारे होणार असतील तर आपण निवडणुकीवर बहिष्कार घालायला हवा, असे राज यांचे मत होते. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केल्याने राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेच्या उमेदवारांची यादी

1. कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) रतन पाटील
2. कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर
3. नाशिक पूर्व - अशोक मुर्तडक
4. माहिम - संदीप देशपांडे
5. हडपसर - वसंत मोरे
6. कोथरूड - किशोर शिंदे
7. नाशिक मध्य - नितीन भोसले
8. नाशिक पश्चिम - दिलीप दातीर
9. वणी - राजू उंबरकर
10. ठाणे - अविनाश जाधव
11. मागाठाणे - नयन कदम
12. कसबा पेठ - अजय शिंदे
13. सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील
14. इगतपुरी - योगेश शेवरे
15. चेंबूर - कर्णबाळा दुनबळे
16. कलिना - संजय तुर्डे
17. शिवाजीनगर - सुहास निम्हण
18. बेलापूर - गजानन काळे
19. हिंगणघाट - अतुन वंदिले
20. तुळजापूर - प्रशांत नवगिरे
21. दहिसर - राजेश येरुणकर
22. दिंडोशी - अरुण सुर्वे
23. कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे
24. गोरेगाव - विरेंद्र जाधव
25. वर्सोवा - संदेश देसाई
26. घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
27. वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

राज ठाकरेंची पत्रकार परिषद