मुंबई: लालबागच्या राजाच्या दरबारात काल पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केल्याचं समोर आलं आहे. पोलिसाचं हे कृत्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दरम्यान, याआधी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही बाचाबाची झाली होती.

 

काल, आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनेचे पत्रकार उदय जाधव यांना सहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकर यांनी धक्काबुक्की केली. जाधव हे काही विचारण्यासाठी पाटणकर यांच्याकडे गेले असताना, त्यांनी ऐकून घेण्याऐवजी त्यांना जोरानं ढकलून दिलं.

 

दरम्यान, काल पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच वाद झाला होता. हा संपूर्ण वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केला आहे. पोलिसांनी एकाच्या अंगावर हात उगारल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतं आहे.

 

कार्यकर्त्यांनी दादागिरीची भाषा केल्याचा आरोप संबंधित पोलिसांकडून करण्यात येतो आहे. तर पोलीसच अंगावर धावून आल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतं आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

 

संबंधित बातम्या:

 

लालबागच्या राजाच्या दरबारात पोलीस आणि कार्यकर्ते भिडले!