मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपांवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीशी आमची सकारात्मक चर्चा सुरु असून जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीला अशोक चव्हाणांसोबत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते.
उद्धव ठाकरे रोज नवीनवीन वक्तव्यं करतात, त्याबद्दल कोणालाही गांभीर्य राहिलेलं नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वासही राहिलेला नाही. त्यांना सत्ता प्रिय आहे, ते सत्तेसाठी त्याग करु शकत नाहीत, असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला. निवडणुका आल्या की राम मंदिरचा विषय निघतो आणि निवडणुका संपल्या की विषयही संपेल, असा घणाघातही अशोक चव्हाणांनी केला.
जागावाटपाबाबत राष्ट्रवादीशी चर्चा अंतिम टप्प्यात : चव्हाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2018 08:00 AM (IST)
विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -