मुंबई  : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपनेते आशिष शेलार यांच्याविरोधात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. शिवाय महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. तर आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून या प्रकरणावरून वातावरण तापले असून आज आशिष शेलार यांनी याबात उत्तर दिले आहे. बदनामीसाठी सत्तेचा दुरूपयोग करत दबाव तंत्राने खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप शेलार यांनी महापौरांवर केला आहे.


आशिष शेलार यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते. मी जे वक्तव्य केलेच नाही त्याबात खोटी तक्रार करण्यात आली आहे, हे प्रकरण पूर्णपणे खोटे आहे. परंतु, एखाद्याची बदनामी करण्यासाठी सत्तेचा दुरूपयोग करून हा एफआयआर दाखल केला आहे. त्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. पण दबण्याचा प्रश्नच येत नाही. मी माझा संघर्ष अजून कडवा करेन. मी राजकिय विषयावर बोलणार नाही. कारण भंबेरी कुणाची उडाली हे दिसून येत आहे. लोकांना सगळ्या गोष्टी दिसत आहे. मी सर्व प्रकारची न्यायलयात लढाई लढेन. ही मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही. असा इशारा शेलार यांनी दिला आहे. 


काय म्हणाले आशिष शेलार? 
"अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात  कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की, मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जणता पाहत आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचे संस्कारही नाहीत. महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेकवर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना मला आहे."


पुढे बोलताना शेलार म्हणारे, ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य,  सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच."
 
असे गुन्हे शंभर वेळा करू
"ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला म्हणून विधानसभेतून निलंबित केले गेले.  महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वरळीतील चिमुरड्याच्या मृत्यूचा जाब सत्ताधीशांना विचारला, कोष्टल रोड मधील भ्रष्टाचार उघड केला, ममतादिदीं सोबतच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा अजेंडा उघड केला म्हणून आता असे खोटे गुन्हे दाखल करुन जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर मग यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल तर मग तो शंभरवेळा आम्ही करु. असे आवाहन शेलार यांनी दिले. 


"माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो खोट्या कुटनितीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही. असे शेलार म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या 


IAF Chopper Crash : कुन्नूर हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या जागी सापडला ब्लॅक बॉक्स, उलघडणार अपघाताचे रहस्य 


Black Box : विमान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत महत्त्वाचा असतो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय करतो काम?