मुंबई: मुंबईसह आज 10 महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उत्साहात मतदान पार पाडलं. जवळजवळ सर्वच ठिकाणी जास्त मतदान झालं आहे. या मतदानानंतर अॅक्सिस आणि इंडिया टुडेनं आपला एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे.
या पोलनुसार, मुंबईत भाजपला जवळजवळ 80 ते 88 जागा मिळतील तर शिवसेनेला 86 के 92 जागा मिळतील. त्यामुळे या दोन्ही पक्षात काट्याची टक्कर पाहायला मिळू शकते. या पोलनंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपली भूमिका एबीपी माझाकडे स्पष्ट केलं.
आम्हाला मुंबईत 114 जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. पू्र्ण मुंबईत मतदान जास्त झालं आहे. सोसायट्यांमधून मतदार कसे बाहेर याची काळजी घेतली.

या एक्झिट पोलनंतर बोलताना शेलार म्हणाले की, 'भाजपला मुंबईमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. तसाच आम्ही प्रचार केला. या एक्झिटपोल बद्दल मला फार काही माहिती नाही.'

'विधानसभा निवडणुकीत मुंबईतून भाजपला 15 जागा मिळाल्या. त्यावेळीही जवळजवळ 54 टक्के मतदान झालं होतं. यंदाही जवळजवळ 53 ते 54 टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे आता मुंबईत भाजपलाच बहुमत मिळणार.' असं शेलार म्हणाले.

'नगरपालिका निवडणुकांनंतर मुंबईसह 10 महापालिकांमध्ये मतदार भाजपवर विश्वास दाखवतील असं मला वाटतं.' असंही शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या:

एक्झिट पोल: मुंबईत भाजपला 80 ते 88 जागांचा अंदाज

अॅक्सिस-इंडिया टुडेचा अंदाज, मुंबई,ठाणे, पुण्यात कोणाची सत्ता?

अॅक्सिस-इंडिया टुडे एक्झिट पोल : पुण्यात कमळ फुलण्याची चिन्हं 

ठाण्यात शिवसेनेची स्वबळावर सत्ता, एक्झिट पोलचा अंदाज 

2012 महापालिका निवडणुकीतील पक्षीय बलाबल, यंदा कोण मारणार बाजी? 

BMC Election 2017 LIVE : मतदानाची वेळ संपली, मतदानाची टक्केवारी वाढली