मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बॉलिवूड अभिनेता आमीर खान आणि मुंबई फर्स्ट या एनजीओविरोधात निवडणूक आयोगात आचारसंहिताभंगाची तक्रार दाखल केली आहे.


अॅडव्होकेट धमेंद्र मिश्रा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. धर्मेंद्र मिश्रा हे युवासेनेचे पदाधिकारीही आहेत.

मुंबई फर्स्टच्या माध्यमातून देण्यात आलेल्या जाहिरातींवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतर आज वृत्तपत्राला जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये बॉलिवूड अभिनेता आमीर खानचा फोटो वापरला आहे. शिवाय पारदर्शकतेला मतदान करा, असं आवाहनही करण्यात आलं आहे. त्यावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे.

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी प्रचारसंपल्यानंतर माध्यमांना मुलाखती देण्याचा धडका सुरु ठेवला आहे. त्याबद्दलही निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे.