मुंबई : यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. त्यामुळे सगळ्याच विभागातल्या लढती चुरशीच्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षातील निवडणूकीचे निकाल पाहिले, तर निसटते विजय आणि निसटत्या पराभवांचा आकडा हा वाढलेला दिसत आहे.
मुंबईसह दहा महापालिकांसाठी मतदान पार पडलं आहे. यंदाच्या निवडणुकीत निसटत्या विजय आणि पराभवांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी मत अन् मत हे महत्त्वाचं आहे. 23 फेब्रुवारीचा मतमोजणीचा दिवस हा प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
2007 आणि 2012 मधील निसटते विजय
2012 मध्ये पाचशेहून कमी फरकाने जिंकलेल्या जागा - 35
शिवसेना- 7
भाजप- 3
काँग्रेस 11
मनसे- 5
राष्ट्रवादी- 1
इतर- 8
2007 मधील निसटते विजय - 28
शिवसेना- 7
भाजप- 4
काँग्रेस- 6
मनसे- 3
राष्ट्रवादी- 4
इतर- 4
मुंबईकर यंदा मतदानाच्या टक्केवारीची नवी नोंद करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईत सरासरी 52.17 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळी म्हणजेच 2012 मध्ये एकूण 44.75 टक्के इतकीच मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली होती.
मुंबई – एकूण सदस्य संख्या – 227
सत्ता – शिवसेना-भाजप युती
शिवसेना – 75
भाजप – 31
काँग्रेस – 52
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
मनसे – 28
समाजवादी पार्टी – 9
अखिल भारतीय सेना – 2
भारिप – 1
रिपाइं – 1
अपक्ष – 15