Ashish Shelar on Aaditya Thackeray : युरोपीयन युनीयनसह जगभरातल्या अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषित केलेल्या आणि पाकिस्तानी एजंटची गुंतवणूक असलेल्या कंपनीसोबत बेस्टच्या ई-बसेसचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. काल विधानसभेत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून पर्यावरण खात्यावर आणि मुंबई महापालिकेवर टीकास्त्र डागलं आहे. कॉसिस ई-मोबिलीटी या कंपनीकडून बेस्टसाठी 1400 बसेस घेतल्या जाणार आहेत. आणि त्याचा मोबदला म्हणून 2800 कोटी रुपये दिले जाणार असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. मात्र मुंबईच्या रस्त्यावर चाचणी न करताच या बसेसचं कंत्राट कसं दिलं, असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे. तसंच या कंपनीत मुख्य गुंतवणूकदार असलेल्या शौकत अली अब्दुल गफूर हा लिबियामधील पाकिस्तानी एजंट असल्याचाही आरोप शेलारांनी केला आहे. इंडियन स्टेट फॉरेस्ट तर्फे जाहीर करण्यात आलेल्या अहवालामध्ये महाराष्ट्रात जंगल वाढले, असं जाहीर करण्यात आलं असलं तरी 1 हजार 882 चौ. किमीचे जंगल गायब झाल्याचंही नमूद करण्यात आलं हे जंगल 1 हजार कोटींचं असल्याचा दावाही शेलारांनी केला आहे. दरम्यान, आरोपाचे उत्तर आणि तुम्ही आमच्या समोर आणून दिलं त्यात काय योग्य असेल तर बघू, असे वक्तव्य करत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शेलार यांच्या आरोपावर सावध पवित्रा घेतला.
युरोपियन युनियनसह जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषीत केलेल्या आणि पनामा पेपर्समध्य नाव आलेल्या पाकिस्तानी एजन्टचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई बसचे कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केला. याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातून 1 हजार कोटींचे बांबू जंगल गायब झाले, तसेच माहूल येथील पर्यावरणाच्या विषयात सरकारनं प्रदुषण करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत कशी केली, याबाबतची माहिती उघड करून विधानसभेत खळबळ उडवून दिली.
आज विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेला सुरूवात झाली या चर्चेत सहभागी होताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पर्यावरण विभागाच्या कामावर जोरदार टीका केली. नुकताच बेस्टच्या ताफ्यामध्ये नव्या ई बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. याबसचे पहिले टेंडर हे केवळ 200 बससाठी काढण्यात आले होते. शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती 900 करण्यात आली पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या 1400 करण्यात आली. तसेच मुंबईतील रस्त्यावर चाचणी न घेता एवढ्या बस घेण्याचा निर्णय किती योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे, असं सांगून आज यावर मी बोलणार नाही असं म्हणत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा व्यवहार ज्या कंपनीशी करण्यात आला, त्या व्यवहारावर मात्र गंभीर स्वरूपात बोट ठेवण्याचे काम आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केलं.
बेस्टसाठी 1400 बस कॉसीस ई मोबिलिटी या परदेशी कंपनीकडून घेण्याचा निर्णय करण्यात आला असून राज्य शासनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत याबाबतचा करार 1 आक्टोबर 2021 रोजी केला. या कंपनीला 2 हजार 800 कोटी रूपये देण्याचं मान्य करण्यात आलं आहे. या कंपनीचा सीईओ हा कॅनडातील नागरीक असून त्याचं नाव तुमुलूरी असं आहे. हा तुमलुरी म्हणजे, जागतीक पातळीवर घोटाळेबाज म्हणून घोषीत असून ज्याप्रमाणे भारताना निरव मोदीला घोटाळेबाज म्हणून घोषीत केलं आहे. त्याप्रमाणे हा तुमलुरी असून त्याला युरिपेयन युनियन सह माल्टा, कॅनडा यांनी हजारो कोंटीच्या घोटाळ्यात फरार आणि मुख्य आरोपी म्हणून घोषीत केलं आहे. त्यावर या देशामध्ये विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यावर कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयानंसुध्दा गंभीर ताशेरे कसे ओढले आहेत? हे सुध्दा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी वाचून दाखवत सदर इसमाच्या गुन्ह्यांबाबतचा एक सविस्तर अहवालच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला.
तसेच सदर कंपनीमध्ये दोन मोठ्या गुंतवणुकदारांचे पैसे असून त्यांची नाव पनामा पेपरमध्ये जाहीर झाली होती. यातील शौकत अली अब्दुल गफूर हा पाकिस्तानी एजन्ट असून तो लिबियामध्ये काम करतो. सदर व्यक्तीचे परवेज मुशरफ सोबतचे फोटो ही दाखविले. तसेच हवाला रॅकेट चालवण्याचे तो शस्त्र पुरवठादार आहे. तसेच याच कंपनीमध्ये अन्य एका माणसाची गुंतवणूक असून त्याचं नाव असद अली शौकत असून हा पाकिस्तानी असून तो दुबईमध्ये राहतो. हा सुध्दा हावाला रॅकेट चालवणारा असून यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीकडून महाराष्ट्र सरकर बेस्टसाठी ई बस घेण्यासाठी का गेले, त्यांनाच हे कंत्राट का देण्यात आले असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.