मुंबईतील संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली.
याच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे पत्रकारावर भडकल्याचं दिसून आलं. 'पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे?' असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे यांचा पारा मात्रा चांगलाचा चढला.
यानंतर आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत अप्रत्यक्षपणे टीका केली. याबाबत त्यांनी अनेक ट्वीट केले आहेत.
'उद्धट' भाषा बोलण्यापेक्षा नम्रपणे माफी मागावी. असा सल्ला आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरेंना दिला आहे.
'पालिकेच्या खुर्च्यांमधील सत्ताधीश कुठे लपुन बसले होते? मॅनहोलमधे? रस्त्यावर भाजपचे आमदार, नगरसेवक लोकांसाठी झटत होते. अर्थात कर्तव्य म्हणूनच!' असं ट्वीट करत शेलार यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला.
त्यामुळे आता आशिष शेलार यांच्या या टीकेला शिवसेना काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.