ठाणे : सहकारी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरुन ठाणे कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई केली.


 

त्यापूर्वी हिरालाल जाधव यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. कॉर्टर्स देण्याच्या बहाण्याने जाधव यांनी आक्षेपार्ह मेसेज आणि फोटो पाठवल्याचा दावा महिला कॉन्स्टेबलने केला आहे.

 

पीडित महिला कॉन्स्टेबल आपल्या आई आणि बहिणीसोबत दुसऱ्या घरामध्ये स्थलांतर करणार होती. पण ऐनवेळी तिला देण्यात येणारे घर दुसऱ्यांना देण्यात आलं. त्याचीच तक्रार करण्यासाठी पीडित महिला हिरालाल जाधव यांच्याकडे गेली. त्याच कामाच्या बहाण्यानं हिरालाल जाधव यांनी तिचा फोन नंबर घेतला आणि वारंवार आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

 

काहीवेळा तर आपल्या कारमधून फिरायला जाण्याची ऑफरही दिल्याचा दावा पीडित महिलेनं केला आहे. या प्रकरणी कारागृह महानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. धक्कादायक म्हणजे हिरालाल जाधव यांच्यावर अशा प्रकारचा हा दुसरा गुन्हा आहे.