Aryan Khan Drugs Case: क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेतून अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी केली. यानंतर न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला वानखेडे यांच्यवर सध्या कोणतेही कठोर पाऊल उचलू नये, अटकेच्या 3 दिवस आधी नोटीस द्यावी, असे सांगितले.


राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटी तपासाविरोधात समीर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तपास सुरू असताना समांतर तपासाची काय गरज आहे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा अन्य केंद्रीय एजन्सीकडे सोपवावा, असे ते म्हणाले. समीर वानखेडे यांच्या याचिकेला राज्य सरकारने विरोध केला.


Exclusive : समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया; म्हणाले...


ते म्हणाले की, वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी प्राप्त झाल्या असून मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. राज्य सरकारच्या वकिलांनी सांगितले की तपास अगदी प्राथमिक टप्प्यावर आहे, सध्या मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवलेला नाही.


क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने अलीकडेच दावा केला होता की एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह एजन्सीच्या काही अधिकाऱ्यांनी क्रूझ जहाजावरील छापा प्रकरणातील आरोपी आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. या आरोपानंतर एनसीबीने दक्षता पथकाची स्थापना केली आहे. दक्षता पथकाने बुधवारी समीर वानखेडे यांची चार तास चौकशी केली. एजन्सीने साईललाही चौकशीसाठी बोलावले आहे.


क्रुझ पार्टी प्रकरणात नवाब मलिकांचा मोठा आरोप, 'त्या' पार्टीचा आयोजक वानखेडेंचा मित्र!


याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनीही एक पथक तयार केले आहे. पोलीस स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी प्रभाकर साईल, अधिवक्ता सुधा द्विवेदी आणि कनिष्क जैन तथा नितीन देशमुख यांनी नोंदवलेल्या तक्रारींची चौकशी करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. या सर्व तक्रारींची एकत्रित चौकशी करण्यात येत आहे.


क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी आर्यन खानला अखेर जामीन मंजूर


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलासा दिला आहे. आर्यन खान प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच्यासोबत मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकालाची प्रत उद्या येणार असल्याने आजची रात्र आर्यन खानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. आर्यन खान उद्या तुरुंगाच्या बाहेर येणार आहे.