Cruise Drugs Case : कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये नवाब मलिक यांनी आज एबीपी माझाशी बोलताना एक मोठा आरोप केला आहे. कॉर्डिलियावरची पार्टी जर एफ टीव्हीचे इंडिया हेड काशिफ खान यांनी आयोजित केली होती. तर त्यांना अटक का झाली नाही, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांनी जारी केलेल्या कॉर्डिलियावरच्या पार्टीतल्या व्हीडिओमध्ये काशिफ खान आपल्या गर्लफ्रेन्डसोबत दिसत आहेत आणि असं असतानाही, पार्टीच्या आयोजकाला का अटक केली नाही, असा सवाल मलिक यांनी विचारला आहे. काशिफ खान आणि समीर वानखेडे हे घनिष्ठ मित्र असल्यानेच त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 


क्रांती रेडकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाल्या, मी बाळासाहेबांचा आदर्श घेऊन वाढलेली मुलगी, न्याय करा!


नवब मलिक  यांनी काल क्रूझ पार्टीमध्ये एक दाढीवला होता आरोप केला तो हा काशिफ खान असल्याची माहिती आहे. काशिफ खान फॅशन टीव्हीचा MD आहे.  त्याने कॉर्डिलिया क्रूझ वर पार्टी आयोजित केली होती. काशिफची प्रियसी रुक्मिणी हुडा हिचे गन बरोबर फोटो आहेत.    


हे ही वाचा- Nawab Malik VS Sameer Wankhede : मी जन्मानं हिंदू होतो आणि आताही हिंदूच; समीर वानखेडेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती 


क्रूझ पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर


काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिकांनी गंभीर आरोप केले होते. मलिक यांनी म्हटलं होतं की, क्रूझ पार्टी प्रकरणात एक बाब समोर आली की या पार्टीत एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सप्लायर होता. त्याठिकाणी त्याची गर्लफ्रेंड देखील होती. बंदूक घेऊन तो दाढीवाला त्याठिकाणी होता. त्याची समीर वानखेडेंसोबत मैत्री आहे. गोव्यात देखील यांनी मोठे व्यवहार केले होते, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आम्ही एनसीबीला सांगितलं होतं की एक दाढीवाला व्यक्ती होता. त्याची मैत्रीण देखील त्याठिकाणी होते. त्यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत आम्ही ते व्हिडिओ देऊ, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. आम्ही त्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. जर त्यांना दाढीवाला त्यांना मिळत नसेल त्याचे व्हिडिओ मिळत नसतील तर मी त्याचे पुरावे अधिकारी ज्ञानेंद्र सिंग यांना देईल. त्यांनी तसे पुरावे मागावेत, असंही मलिक यांनी म्हटलं होतं.


नवाब मलिकांचा नवा दावा, समीर वानखेडेंचा 'निकाहनामा' केला जाहीर, वानखेडेंच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटोही ट्वीट