मुंबई : “शाळेत असताना नाटकात काम करायला मिळाले नसल्यानेच आपण नाटकात काम करण्यासाठी आणखी जिद्दीने वाटचाल सुरु केली,” असे उद्गार ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांनी काढले. गिरगावमधील आर्यन शाळेच्या १२१ व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांचा हा खास सत्कार करण्यात आला.
यावेळी आर्यन शाळेचे माजी विद्यार्थी ज्येष्ठ नाट्यकर्मी जयंत सावरकर यांना संस्थेने खास मानपत्र प्रदान करुन गौरवण्यात आलं. या सत्काराला उत्तर देताना जयंत सावरकर यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला. काही आठवणी सांगताना त्यांचे डोळेही पाणावले होते.
या वर्धापन दिनानिमित्ताने वर्षभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना तसंच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनाही गौरवण्यात आले.
संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष आमोद उसपकर, विश्वस्त भारत हाटे, यशवंत देवस्थळी, किरण उमरुटकर तसंच खजिनदार किशोर खरे यांच्यासह शाळेचा आजी-माजी शिक्षक वर्ग आणि पारितोषिक प्राप्त विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते.
... म्हणून जिद्दीने नाटकात काम सुरु केलं : जयंत सावरकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2018 09:51 PM (IST)
गिरगावमधील आर्यन शाळेच्या १२१ व्या वर्धापन दिनी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जयंत सावरकर यांचा खास सत्कार करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -