मुंबई: विरार-वसई-पनवेल या 70 किलोमीटरच्या दुहेरी रेल्वे मार्गाची मंजूरी अंतिम टप्प्यात आली आहे.. येत्या 21 डिसेंबर याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन पंतप्रधान आपल्या 24 डिसेंबरच्या मुंबई दौऱ्यात या नव्या मार्गाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
या 70 किलोमीटरच्या मार्गावर एकूण 23 रेल्वे स्थानक असतील, ज्यात 11 नवी स्थानकं असतील. तर यात नवी डोंबिवली या नव्या रेल्वे स्थानकाचाही समावेश असेल. या नव्या मार्गामुळं पनवेल, डोंबिवलीवरुन थेट पश्चिम मार्गावर जाता येणार आहे.
दिवा-वसई आणि दिवा-पनवेल या सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गाच्या बाजूनेच हा नवीन मार्ग तयार होणार असून त्यासाठी ९००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.